मंत्री सावंत, डॉ. विजय भटकर, विभागीय आयुक्त, सदर्न कमांड प्रमुखांचा समावेश
अयोध्येत श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या रामलला स्वरूपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विक्रम संवत २०८० पौष शु. एकादशीला येत्या २२ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे. त्यानिमित्त श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासतर्फे पुणे महानगर समितीच्यावतीने श्री रामलला प्रतिष्ठापना सोहळ्याच्या अक्षता वितरण आणि निमंत्रण अभियान सुरू आहे.,
या अभियानातंर्गत अद्यापपर्यंत आरोग्यमंत्री तानाजी सावंत, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, विभागीय आयुक्त सौरभ राव, माजी विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर, सदर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अरूण कुमार सिंग, मेजर जनरल विक्रांत नाईक, पर्सिस्टंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचावक आनंद देशपांडे, एमक्युअर फार्माचे सतीश मेहता, अॅड. एस. के. जैन, नेमबाज अंजली भागवत, किर्लोस्कर समूहाचे संजय किर्लोस्कर, पंचशील रिअॅल्टीचे अतुल चोरडिया, डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, उद्योजक नितीन देसाई, ऋषिकेश सावंत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, डॉ. चारूदत्त आपटे व सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संपादक अभिजित पवार यांना अक्षता वितरण आणि निमंत्रण देण्यात आली आहेत.
Tags: NULL