पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी व्हायब्रंट गुजरात ग्लोबल परिषद २०२४ चे उदघाटन केले. या दरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी १३० पेक्षा अधिक देशांमधील प्रतिनिधींचे स्वागत केले. तसेच यावेळी पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना संबोधित केले. संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी भारतातील बंदरे आणि त्यांची पायाभूत सुविधांसाठी भरीव गुंतवणुकीच्या घोषणा केल्या. तसेच देशाची आर्थिक गती यावर देखील त्यांनी भाष्य केले.
भारतातील बंदरे आणि त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये नवीन गुंतवणुकीसाठी संयुक्त अरब अमिरातीमधील कंपन्यांसह अब्जावधी डॉलर्सचे करार करण्यात आल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”संयुक्त अरब अमिरातमधील कंपन्यांनी भारताच्या बंदर आणि त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये अब्जावधी डॉलर्सच्या नवीन गुतवणुकीसंदर्भात करार करण्यात आले आहेत.”करण्यात आलेले हे करार भारताच्या सागरी भागांमध्ये परिवर्तन करण्यासाठी, आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी आणि जागतिकदृष्ट्या व्यापाराची कनेक्टिव्हीटी वाढवण्यासाठी करण्यात आले आहेत. आपल्या संबोधनामध्ये पंतप्रधानांनी आव्हानात्मक जागतिक परिस्थिती स्वीकार केली आहे. मात्र भारताच्या उल्लेखनीय आर्थिक प्रतिकार आणि विकास गतीवर प्रकाश टाकला.
पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले, ”आम्ही सर्व जागतिक परिस्थितींबद्दल जागरूक आहोत. त्यामुळे, अशा काळामध्ये भारतातील विकासाला गती प्राप्त होत असेल, तर यामागचे कारण हे गेल्या १० वर्षांमध्ये संरचनात्मक सुधारणांवर केलेले आमचे काम आहे. या सुधारणांमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेची क्षमता, क्षमता आणि स्पर्धात्मकता वाढली आहे.” दहा वर्षांपूर्वी भारताने अर्थव्यवस्थांच्या आकडेवारीत ११ व्या स्थानावरून लक्षणीय झेप घेतली आहे. तर आज भारत जागतिक स्तरावर पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश बनला आहे. आज सर्व प्रमुख संस्थांचा अंदाज आहे की, येत्या काही वर्षांमध्ये भारत हा जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल. जगभरातील लोकांना त्यांचे विश्लेषण करू द्या, मात्र हे होईल अशी माझी खात्री आहे. ”