नवी दिल्ली : 22 जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन येथे सुरू होणाऱ्या चार देशांच्या स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने 26 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या स्पर्धेमध्ये भारत, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड हे देश सहभागी होणार आहेत. तर भारतीय संघाने आपल्या संघाची घोषणा केली असून संघाचे नेतृत्व हरमनप्रीत सिंग करणार आहे. तर एफआयएच प्लेयर ऑफ द इयर विजेता हार्दिक सिंग उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.
ज्युनियर संघासोबत उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर युवा खेळाडू अरजीत सिंग हुंदल आणि बॉबी सिंग धामी यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच गोलरक्षक पीआर श्रीजेश, कृष्ण पाठक आणि पवन यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. तर बचावपटू जर्मनप्रीत सिंग, जुगराज सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग, वरुण कुमार, सुमित, संजय आणि रविचंद्र सिंग मोइरांगथेम यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
तसेच संघामध्ये विवेक सागर प्रसाद, नीलकांत शर्मा, राजकुमार पाल, समशेर सिंग, विष्णुकांत सिंग, हार्दिक सिंग आणि मनप्रीत सिंग अशी मिडफिल्डरची निवड करण्यात आली आहे. फॉरवर्ड लाइनमध्ये मनदीप सिंग, अभिषेक, सुखजीत सिंग, गुरजंत सिंग, ललित कुमार उपाध्याय, आकाशदीप सिंग, अराईजीत सिंग हुंडल, बॉबी सिंग धामी हे खेळाडू असणार आहेत.
या स्पर्धेबाबत बोलताना मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन म्हणाले की, “आम्ही या स्पर्धेसाठी खूप उत्सुक आहोत. आम्ही एक मोठा संघ निवडला आहे. तसेच या स्पर्धेतून मला काही खेळाडूंना FIH हॉकी प्रो लीगपूर्वी स्पर्धात्मक पद्धतीने पाहण्याची संधी मिळेल. सोबतच आम्ही वरिष्ठ संघात दोन युवा खेळाडूंचाही समावेश केला आहे. त्यामुळे आता आम्ही ज्या स्तरावर खेळतो त्याच्याशी ते कसे जुळवून घेतात हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.”
भारतीय संघ खालीलप्रमाणे:
गोलरक्षक: श्रीजेश परत्तू रवींद्रन, कृष्ण बहादूर पाठक, पवन
बचावपटू: जर्मनप्रीत सिंग, जुगराज सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग , वरुण कुमा, सुमित, संजय, रबीचंद्र सिंग मोइरांगथेम
मिडफिल्डर: विवेक सागर प्रसाद, नीलकांत शर्मा, राजकुमार पाल, शमशेर सिंग, विष्णुकांत सिंग, हार्दिक सिंग , मनप्रीत सिंग
फॉरवर्डः मनदीप सिंग, अभिषेक, सुखजीत सिंग, गुरजंत सिंग, ललित कुमार उपाध्याय, आकाशदीप सिंग, अरैजीत सिंग हुंडल, बॉबी सिंग धामी.