गुजरामध्ये सध्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल परिषद २०२४ सुरु आहे. या परिषदेमध्ये दुसऱ्या दिवशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (GIFT सिटी) मधील सध्याच्या आर्थिक परिसंस्थेची माहिती तसेच वर्णन केले. तसेच त्यांनी यावेळी शहरातील धोरणे व विविध आर्थिक संस्थांची लक्षणीय उपस्थिती आणि प्रगतशील बाजाराबद्दल भाष्य केले.
निर्मला सीतारामन बोलताना म्हणाल्या, ”IFSC मध्ये आता तीन एक्सचेंज, २६ बँक आहेत. मान कंपन्यांची कार्यालये होस्ट करण्यासाठी गिफ्ट सिटी आवश्यक आहे.गिफ्ट सिटीमध्ये विमान कंपन्यांची कार्यालये सुरु करणे आवश्यक आहे. गिफ्ट सिटीमध्ये ८६ निधी व्यवस्थापक आणि ५० व्यावसायिक कंपन्यांचे सल्लगार आहेत. गिफ्ट सिटीमध्ये ५८० संस्था आहेत. ऑक्टोबर महिन्यापर्यंत गिफ्ट सिटीचे डेरिव्हेटीव्ह करार हा २.०२ अब्ज अमेरिकी किंमतीचे होते.”
अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, ”जागतिक स्तरावर फिनटेकसाठी सर्वोत्तम दर हा ८० टक्के इतका आहे. भारतात असणारी एक जागतिक फिनटेक कंपनी गिफ्ट सिटीमध्ये असणे आवश्यक आहे. भारतात व्यवसाय करू पाहणाऱ्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय फिनटेक कंपनीचे कार्यालय गिफ्ट सिटीमध्ये असणे आवश्यक आहे.” पुढे बोलताना निर्मला सीतारामन यांनी गिफ्ट सिटीमध्ये विमान कंपन्यांनी आपले कार्यालय स्थापन करण्याबाबतचे महत्व अधोरेखित केले. ८६ निधी व्यवस्थापक आणि ८ शिप लिजिंग कंपन्यांनी आधीच आर्थिक केंद्रामध्ये काम सुरु केल्याचा खुलासा देखील त्यांनी केला. निर्मला सीतारामन यांच्या मते, गिफ्ट सिटीमधील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (IFSC) हे जागतिक स्तरावरील एक प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाईल.