आज दुपारी दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात पुन्हा एकदा .भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नोयडा, गुरूग्राम भागात देखील धक्के जाणवले. अफगाणिस्तानातील फैजाबाद मध्ये ह्या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर आली आहे. अफगाणिस्तानातील सीमा भागात मोठे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 6.2 रजिस्टर स्केल एवढी आहे.
बराच वेळ हे भूकंपाचे धक्के जाणवत होते. हे धक्के जाणवताच लोक आपल्या घरातून आणि कार्यालयांमधून बाहेर आले, सध्या तरी ह्यामध्ये कोणतीही जिवीत अथवा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही.