देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये आज दुपारच्या वेळेस भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. अचानक जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिक घाबरले व त्यांनी घराच्या बाहेर धावले. तसेच दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याने ऑफिसमधील लोक देखील सुरक्षित ठिकाणी जाऊन थांबली होती.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता ही ६.१ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू हा पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेजवळ होता. मात्र या भूकंपामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. दिल्ली एनसीआरसह जम्मू-काश्मीरमधील पुंछ भागातही भूकंपाचे धक्के जाणवले.