यंदा २०२४ या वर्षात लोकसभा निवडणूक होणार आहे. त्याआधी अर्थसंकल्पीय अधिवेशनाची घोषणा झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे केंद्र सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशन हे ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प मांडतील. ३१ जानेवारी रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर अधिवेशनाची सुरुवात होणार आहे.
मोदी सरकारच्या दुसऱ्या काळातील हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. निवडणुकीच्या आधीच हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याने यामध्ये अनेक योजनांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. महिला आणि शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. निडवणुकीच्या काळामध्ये देशामध्ये दोन अर्थसंकल्प सादर केले जातात. पहिला अर्थसंकल्प विद्यमान सरकार मांडते तर निवडणुकीनंतर स्थापन झालेले सरकार नवीन अर्थसंकल्प मांडते.