स्वामी विवेकानंद म्हणजेच नरेंद्र यांचा जन्म १२ जानेवारील १८६३ सांगली कलकत्ता येथे श्री.विश्वनाथ दत्त अन् भुवनेश्वरी देवी या माता पित्यांच्या पोटी झाला.११ सप्टेंबर १८९३ म्हणजे वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी अमेरिकेत शिकागो मधे आयोजित सर्वधर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले. १८९७ सांगली विवेकानंद यांनी गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या नावाने रामकृष्ण मठ, रामकृष्ण मिशनची स्थापना केली.
नेताजी सुभाषचंद्र बोस स्वामी विवेकानंदांबद्दल गौरवोद्गार काढतात,” स्वामी विवेकानंदांनी पूर्व आणि पश्चिम संस्कृतीत सामंजस्य स्थापित केले.तसेच विज्ञान,धर्म,अतीत व वर्तमानात सुसूत्रता,सुसंबंध प्रस्थापित केलेत म्हणूनच ते अभ्यासनीय एक अनुकरणीय, पूजनीय,महान व्यक्तीमत्त्व आहेत .”स्वामी विवेकानंदांनी ध्यान,योग व अन्य अध्यात्मिक विचार प्रभावीपणे संपूर्ण विश्वाला समजाविले.
हिंदू धर्माबाबत परदेशातील लोकांचा दृष्टिकोन सकारात्मक रित्या बदलविला . विवेकानंद यांना ” युगपुरुष युगनिर्माता, युगनायक, महामानव, विश्वमानव ” इत्यादी पंचाक्षरी विशेषणांनी गौरविले आहे.विवेकानंद व्यक्ती नसून संपूर्ण मानवजातीला वेढून टाकणारे तत्त्व आहे.स्वामी निरभ्र,निर्मळ,निळेशार, गंभीर विचारांचा लख्ख प्रकाश देणारे आकाश आहे.
स्वामी विवेकानंद यांच्या व्यक्तिमत्त्वात कालीमातेचा आशीर्वाद,गुरु रामकृष्णांचे संस्कार , रामाची सर्वांनाच जवळ घेण्याची वृत्ती, योगेश्वर कृष्णाचा कर्मयोग, ज्ञानेश्वरां समान माऊलीपण,बुद्धांचा सारखे कारूण्यपूर्ण मन, हरिश्चंद्राची सत्यवादी,शुकदेवांचे वैराग्य, परिभ्रमणाची अनुभूतीने व्यथित मन या सर्वांच्या प्रभावामुळे वाणी सरस्वतीची होती.त्यांच्या चरित्र, चारित्र्याचे वाचन,मनन, चिंतन करून स्वतः:ला उन्नत करावे.
“थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा l
आपण व्हावे समान त्यांच्या हाच सापडे बोध खरा ll”
जयहिंद.
llभारत माता की जय ll
श्रीमती रंजना राम शास्त्री, पुणे
सौजन्य- समिती संवाद,पश्चिम महाराष्ट्र प्रांत