सध्या जगामध्ये जगभरामध्ये युक्रेन आणि रशिया यांच्यात गेले दोन वर्षे युद्ध सुरू आहे. त्यानंतर इस्राइल आणि हमास देखील युद्ध सुरू झाले आहे. इस्राइल सरकार हमासविरोधात अत्यंत आक्रमक कारवाई करताना दिसून येत आहे. इस्राइल गाझापट्टीमध्ये जोरदार हल्ले करत आहे. गाझापट्टीमध्ये इस्राइल लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये हमासचा कमांडर आणि डझनभर दहशतवादी मारले गेल्याचे इस्राइल संरक्षण दलाने सांगितले.
दक्षिणी गाझामध्ये असणाऱ्या खान युनिस या शहरामध्ये इस्त्रायली लढाऊ विमानाने केलेल्या हल्ल्यामध्ये हमासच्या लष्करावर हल्ला केला. यामध्ये डझनभर दहशतवादी ठार झाले आहेत. तसेच ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये हमासच्या एलिट नुखबा फोर्समधील कमांडर देखील मारला गेला आहे. ७ ऑक्टोबर गाझा-क्षेत्रातील समुदायांमध्ये इस्रायलींच्या नरसंहारात भाग घेतला होता.
खान युनिसमध्ये इतर सैन्य तुकड्यांनी एके-47 रायफल व आरपीजी लाँचर्स जप्त करून शस्त्रास्त्रे साठवण्याची सुविधा उद्ध्वस्त केली.मध्य गाझामधील मघाझी शहरामध्ये इस्त्रायली लष्कराने सुमारे २० दहशतवाद्यांना ठार केले , ज्यामध्ये अनेक नुखबा फोर्स कमांडर यांचा समावेश होता. मगाझी शहरामध्ये अनेक ठिकाणी, सैनिकांनी तीन सशस्त्र दहशतवाद्यांना हमासच्या परिसरातून बाहेर पडताच इस्त्राईलच्या जवानांनी जोरदार गोळीबार करून या दशतवाद्यांना यमसदनी धाडले.