सध्या संपूर्ण देश अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराच्या उद्घाटनानिमित्त होणार्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची वाट पाहत आहे. यामध्ये एक कुटुंब आहे ज्यांच्यासाठी हा प्रसंग आणखी खास आहे. कोलकाता येथील कोठारी कुटुंब या खास दिवसाची खूप दिवसांपासून वाट पाहत होते. 30 ऑक्टोबर 1990 रोजी या कुटुंबातील दोन भाऊ राम आणि शरद हे वादग्रस्त बाबरी मशिदीवर भगवा झेंडा फडकवणाऱ्या लोकांपैकी एक होते. नंतर 2 नोव्हेंबर 1990 रोजी तत्कालीन मुलायम सिंह सरकारने पोलीस दलांना कारसेवकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. तर रामजन्मभूमी मंदिरादरम्यान राम आणि शरद कोठारी हुतात्मा झाले होते.
आज त्यांची बहीण पूर्णिमा यांना 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या सोहळ्याचे आमंत्रण मिळताच पूर्णिमा यांनी आनंद व्यक्त करत म्हटले आहे की, गेल्या 33 वर्षांतील हा पहिला आनंद आहे. आमच्या भावांच्या बलिदानानंतर आम्ही 33 वर्षे वाट पाहिली आणि आम्ही खूप आनंदी आहोत. माझ्या भावांसोबत जे घडले ते आम्ही विसरलो नाही. पण आम्ही आज भव्य राम मंदिर पाहण्यास सक्षम आहोत. मात्र, एका क्षणी आम्ही सर्व आशा गमावल्या होत्या, मला वाटले की मी ते कधीही पाहणार नाही. पण आज मला आनंद आणि अभिमान आहे की माझ्या भावांच्या बलिदानाला आज आदर मिळत आहे”
जेव्हा पूर्णिमा कोठारी यांना विचारण्यात आले की आपल्या भावांचे बलिदान व्यर्थ गेले असे कधी वाटले होते, तेव्हा त्या म्हणाल्या, 2014 पूर्वी असेच वाटले होते कारण जेव्हा प्रभू रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, तेव्हा रामभक्तांनाही अराजकवादी (हिंसक मार्ग वापरणारे) मानले जात होते. तसेच त्यावेळी आमच्या अपेक्षाही खूप कमी झाल्या होत्या, पण आता देशातील वातावरण खूप चांगले आहे. आज इथे आल्याचा मला खूप अभिमान वाटतो. तसेच नंतर तर मी ऐकले की, मुलायमसिंग यांनी कारसेवकांवर गोळीबार केल्याचा पश्चाताप त्यांना झाला होता. पण त्यातून त्यांना काय मिळाले? त्यांनी हे फक्त काही मतांसाठी केले होते.
22 जानेवारीला होणाऱ्या अभिषेक सोहळ्याचे निमंत्रण विरोधी पक्षनेत्यांनी नाकारल्याबद्दल पूर्णिमा कोठारी म्हणाल्या की, आमंत्रण मिळूनही ते येत नाहीत हे त्यांचे दुर्दैव आहे. तसेच या सोहळ्याला येणारे असे भरपूर लोक आहेत जे काहीही उद्देश किंवा कारणांमुळे येणार आहेत. सोबतच असेही काही लोक आहेत जे या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाहीत तरीही ते अयोध्येत येऊन आनंदी आहेत. पण विरोधकांबद्दल बोलायचे झाले तर ते शेवटी राजकारणी आहेत त्यामुळे ते त्या दृष्टीकोनातून सर्वकाही पाहतील.