पश्चिम बंगालमध्ये उत्तर प्रदेशातील तीन साधूंवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. पुरुलीयामध्ये हिंसक जमावाने तीन साधूंवर जीवघेणा हल्ला केला आहे हे साधू गंगासागर यात्रेसाठी निघाले होते.काशीपूरमध्ये त्यांनी गावक-यांना रस्ता विचारला त्यावेळी गावातील काही लोकांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करत त्यांच्या गाडीचीही तोडफोड केली.पोलिसांनी वेळीच धाव घेत हिंसक जमावाच्या तावडीतून या साधूंची सुटका केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तीन साधू उत्तर प्रदेशातून वाहन भाड्याने घेऊन गंगासागर जत्रेला जाण्यास निघाले होते यावेळी रस्ता चुकला,म्हणून त्यांनी तीन मुलींना रस्ता विचारला असता साधूंना पाहताच मुली ओरडत पळत सुटल्या. यानंतर स्थानिक लोकांनी साधूंना पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रकरण वाढल्याने स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिन्ही साधूंना काशीपूर पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
दरम्यान या प्रकरणावर श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त करत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मुमताज खान हे नाव कोणीतरी दिले होते.ते योग्य असावे कारण भगवा रंग पाहिल्यावर ममता बॅनर्जी यांना राग येतो आणि त्यामुळेच त्या हे हल्ले घडवतात. रामनवमी आणि इतर धार्मिक मिरवणुकांवर अश्या प्रकारचे हल्ले झाले आहेत. साधूंवर झालेल्या हल्ल्याच्या या घटना अत्यंत निषेधार्ह आहेत.