पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेड इन इंडिया’ ही संकल्पना देशासमोर मांडली. त्यानंतर अनेक गोष्टींचे उत्पादन या संकल्पनेअंतर्गत देशात करण्यात येऊ लागले आहे. त्यातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे देशाच्या संरक्षणासाठी गरजेची असलेली शस्त्रात्र सामग्री होय. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे कर्तव्यपथावर सैन्यदलांचे संचलन होणार आहे. या परेडमध्ये भारतीय सेना भारतीय बनावटीच्या शस्त्रात्रांचे प्रदर्शन करणार आहे
भारतीय सैन्य दल यंदाच्या प्रजासत्ताक दिनी LCH प्रचंड हेलिकॉप्टर, पिनाका मल्टी-बॅरल रॉकेट लाँचर्स आणि नाग अँटी-टँक क्षेपणास्त्रांसह मेड-इन-इंडिया शस्त्र प्रणाली आणि प्लॅटफॉर्म हे परेडचे मुख्य आकर्षण असणार आहे.एलसीएच प्रचंड हे पहिले स्वदेशी मल्टी-रोल कॉम्बॅट हेलिकॉप्टर आहे जे एचएएलने डिझाइन व तयार केली. यामध्ये जमिनीवर व हवेत शक्तिशाली हल्ला करण्याची क्षमता आहे. हेलिकॉप्टरमध्ये रात्रीच्या वेळेस देखील हल्ला करण्याची क्षमता आहे.
नाग अँटी टॅंक क्षेपणास्त्रे डीआरडीओने निर्माण केले आहे. दिवसा व रात्रीच्या वेळेस शत्रूंच्या टॅंकचा सामना करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. या क्षेपणास्त्रांमध्ये “फायर अँड फरगेट” “टॉप अटॅक” क्षमता आहे ज्यामध्ये पॅसिव्ह होमिंग मार्गदर्शन आहे जे संयुक्त आणि प्रतिक्रियाशील आर्मरने सुसज्ज असलेल्या सर्व एमबीटींना पराभूत करते. भारतीय उद्योगाने स्वदेशी उत्पादित केलेले आधुनिक चिलखती वाहने आणि विशेषज्ञ वाहने देखील या परेडमध्ये प्रदर्शित केली जाणार आहेत, ज्या ठिकाणी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन प्रमुख पाहुणे असणार आहेत.
क्विक फायटिंग रिअॅक्शन व्हेईकल, लाइट स्पेशालिस्ट व्हेईकल आणि ऑल टेरेन देखील कर्तव्यपथावर परेडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तसेच शस्त्रास्त्र प्रणालींमध्ये T-90 टँक, BMP-2 पायदळ लढाऊ वाहन, c, ड्रोन जॅमर, मध्यम श्रेणीच्या पृष्ठभागापासून हवाई क्षेपणास्त्र लाँचर आणि मल्टी-फंक्शन रडार यांचाही समावेश असेल. यंदाच्या प्रजसत्ताक दिनाच्या परेडमध्ये कर्तव्यपथावर भारतीय संरक्षण दलांमध्ये महिलांची तुकडी दिसणार आहे. यामध्ये भारतीय लष्कर, वायुसेना आणि नौसेनेतील महिला सैनिकांचा समावेश आहे.