येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य राम मंदिरामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. ५०० वर्षांपासून राम मंदिरासाठी अनेकांनी संघर्ष केला. अनेक कारसेवकांना यामध्ये आपले प्राण देखील गमवावे लागले. मात्र अखेर सर रामभक्तांचे स्वप्न येत्या २२ तारखेला पूर्ण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्याला हजारो व्हीआयपी लोकांना निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच देशातील नागरिकांना या दिवशी शक्य असेल त्या प्रकारे आनंदोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांनी १४ ते २२ जानेवारी दरम्यान देशातील प्रत्येक मंदिरामध्ये स्वच्छता अभियान राबवावे असे आवाहन देखील केले आहे. या दरम्यान पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये बोलताना माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मनसैनिकांना आवाहन केले आहे.
राज ठाकरे पुण्यातील एका कार्यक्रमानिमित्त बोलताना म्हणाले, ”२२ जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. ज्या कारसेवकांनी तिथे कष्ट घेतले, त्यांनी जे स्वप्न पाहिले ते स्वप्न २२ तारखेला पूर्ण होत आहे. त्या कारसेवकांसाठी म्हणून जिथे जिथे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने, चांगल्या अर्थाने जिथे जिथे तुम्हाला आरत्या जे काही चांगले करता येईल ते लोकांना त्रास न देता ते करावे. या गोष्टी माझ्या महाराष्ट्र सैनिकांकडून महाराष्ट्रात होणे गरजेचे आहे.”
अयोध्येमध्ये ५०० वर्षांनंतर प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर निर्माण होत आहे. येत्या २२ जानेवारीला या भव्य मंदिरामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. देशभरामध्ये आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. हिंदू धर्मीयांसाठी हा क्षण अतिशय आनंदाचा आणि अभिमानस्पद असा असणार आहे.