कारंजगावी माधव आणि आंबा यांना श्रीपाद श्रीवल्लभ या दत्ताच्या पहिल्या अवातराने दिलेल्या मागच्या जन्मीच्या आशीर्वादाने आणि शनिप्रदोषाच्या व्रत्ताच्या पुण्याने पुत्र जन्मला..अतिशय तेजपुंज असा पुत्र लाभला..तो दिवस होता पौष शुक्ल द्वादशी मध्यान्ह काळी.
नामकरण झाले.शाळिग्राम असे जन्म नावं व नरहरी हे नावं जन्मतः न रडता ओमकराचे उच्चारण करणारा बालक हा हरिच असू शकतो असे आई वडिलांना वाटतं होते, म्हणुन नरहरी नाव ठेवले . पुढें तेच नाव प्रचलित झाले.
आई वडील खुश होते. जन्मतःच हे बाळ न रडता फक्त आणि फक्त ओंकार म्हणे. वडिलांनी ज्योतिषांना बोलावलं ज्योतिषांनी हा मुलगा अजरामर होईल …सगळ्या जगाचा संसार करील , पण स्वतः ब्रह्मचारी राहील. अनेकांना अनुग्रह देऊन त्यांचा उद्धार करेल असे जातक वर्तवले .
नरहरी हळूहळू मोठा होऊ लागला तीन महिन्यांचा झाला असता आईला नरहरीला दूध पुरेना असं वाटून तिने माधव यांना शेळी घ्यावी अशी मागणी केली पण हे ऐकताच बाळाने उजव्या हाताने स्तनाला स्पर्श करताच आईला पान्हा फुटला आणि नरहरीचे पोट भरेल इतके दूर त्याला दूध मिळू लागले.
आता नरहरी सहा महिन्यांचा झाला होता. काही केले तरी तो पाळण्यात झोपत नव्हता. जमिनीवरच तो झोपू लागला, जणू काही संन्यास धर्माचं पालन तो तेव्हापासूनच करत होता.
आता तो एक वर्षाचा झाला पण ओंकाराशिवाय तोंडून एकही शब्द तो उच्चारतच नव्हता.
नरहरी सात वर्षांचा झाल्यावर मात्र आई-वडिलांची चिंता खूपच वाढली आपल्या हातून कुठले पातक झाले आणि मुका मुलगा जन्माला आला, असं त्यांना वाटू लागले. पण नरहरीने हाताने खुणा करूनच माझी मुंज करा तरच बोलीन असं सांगितले आणि त्याप्रमाणे आठव्या वर्षात पदार्पण करताच नरहरीचा मौजी बंधनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रम होताच नरहरीने वेद बोलायला सुरुवात केली.भिक्षावळीलाही भिक्षामदेही असे म्हणून मातेची आज्ञा मागितली.
ब्रह्मचर्य आश्रम आणि नंतर सन्यास घेण्यासाठी गृहत्याग करेन असे आईला सांगितले तुझे भिक्षेचे व्रत मला दिले आहेस ते मला आता पाळायचे आहे.. आता मला थांबवू नकोस. पण आई म्हणाली “मात्र आत्ताच तुझ्या तोंडून मी बोल ऐकत आहे आणि आणि तू ब्रह्मचर्यातून संन्यास आश्रमात कसा प्रवेश करू शकतोस? हे शास्त्राच्या धर्माच्या विरुद्ध आहे!” पण त्या बालकाने आईला सांगितले की जे आवतारी असतात त्यांनाही कसलीही बंधने नसतात.
आईने नरहरीला अशी शपथ घातली की मला एक मुलगा होईपर्यंत तरी तू गृहत्या करू नयेस. हे नरहरीने मान्य केले. “आई तुला एक काय दोन मुले होईपर्यंत मी थांबेन , पण त्याच्यानंतर तू तुझा शब्द पाळशील” .
त्या एका वर्षात त्या गावातील लोकांनी नरहरी कडून वेद शिकायला सुरुवात केली. खूप लांबून लांबून लोक त्यांच्या त्यांच्याशी संवाद करण्या साठी,नमस्कार करण्यासाठी,शंका निरसन करण्या साठी येऊ लागले.
इकडे नरहरीने सांगितल्याप्रमाणे आंबा माधव यांना जुळे पुत्र झाले ते तीन महिन्यांचे झाले असता नरहरीने आई-वडिलांची आज्ञा मागितली आणि ते तिथून निघाले.
पूर्ण कारंजा गाव त्यांच्या दर्शनासाठी तिथे जमले होते. तेंव्हां त्यांनी आई-वडिलांना त्यांचं दत्त स्वरूपात दर्शन दिलं आणि म्हणाले आता मात्र तुम्ही घरी परत जा आणि संसार कर्तव्य पार पाडा शेवटच्या वर्षात तुम्ही काशी येथे जाऊन ईश्वर चिंतनात काळ घालवावा म्हणजे तुम्ही मोक्षाला प्राप्त व्हाल असे सांगून ते निघून गेले.
त्यानंतर पूर्ण भारतभर प्रवास करून अनेकांना अनुग्रह दिले जगाच्या कल्याणा अर्थ कार्य केले लिखाण केले जन्मतः त्यांना अष्ट सिद्धी प्राप्त होत्या.
गाणगापूर येथे त्यांच्या निर्गुण पादुका ठेवल्या व गंधर्पुरा येथे भीमा अमरजा संगम येथे शेवटी शेवंतीचे आसन करून संगमा मध्ये ते समाधीस्थ झाले.
“चित्त शुद्ध ठेवून विवेकाने वागा.
काया,वाचा, मने कोणासही दुखू नका.” असा उपदेश करून मल्लिकार्जुनशी निजवटीत एकरूप झाले.
मोना अजिंक्य बडवे
रुक्मीणी शाखा,लष्कर भाग,हडपसर
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत