हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरी केला जातो. तर दक्षिण भारतात पोंगल हा सण मकर संक्रांतीच्या दिवशी साजरा केला जातो. तर यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील राज्यमंत्री एल मुरुगन यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि पोंगल उत्सवात सहभागी झाले. यावेळी पुद्दुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर आणि तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदर्यराजनही तेथे उपस्थित होत्या.
एएनआयने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी एका अनोख्या लूकमध्ये दिसत आहेत. मोदी पारंपारिक पोशाख परिधान करून राज्यमंत्री एल मुरुगन यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि तेथील पूजेत सहभागी झाले. यावेळी पंतप्रधानांनी पूजा करत गायीची पूजा केली आणि तिला नैवेद्य खाऊ घातला. सध्या सोशल मीडियावर मोदींचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यांच्या या अनोख्या पोशाखाचं कौतुक होत आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी सर्वांना पोंगल सणाच्या शुभेच्छा देतो. पोंगलच्या दिवशी तामिळनाडूतील प्रत्येक घरातून पोंगलची धारा वाहते. अशाच प्रकारे तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी सतत नांदत राहो हीच सदिच्छा. तसेच पोंगलच्या या पवित्र सणाच्या दिवशी देशाची एकात्मता मजबूत करण्याचा आपला संकल्प आहे.
https://twitter.com/ANI/status/1746410652279927149
पोंगल हा सण तमिळ नववर्षाची सुरूवात मनला जातो. चार दिवस चालणारा हा उत्सव दररोज वेगवेगळ्या देवतांच्या पूजेला समर्पित असतो. तर दक्षिण भारतात जेव्हा सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो तेव्हा पोंगल हा सण साजरी करण्याची परंपरा आहे. तसेच लोक पीक कापणीनंतर देवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोंगल सण साजरी केला जातो.