सध्या संपूर्ण देशभरात मकर संक्रांत, लोहरी आणि बिहू हे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. अनेक राज्यांमध्ये कापणीचा शेवट हा या सणांच्या माध्यमातून देवाचे आभार मानण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. शेतकरी त्यांच्या शेतामध्ये पहिले पीक घेतल्यानंतर पृथ्वी मातेची पूजा करतात. तसेच या दिवशी लोक आपापल्या घरी गोड पोंगल तयार करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात. तर या खास दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मकर संक्रांती, लोहरी आणि बिहूच्या शुभमुहूर्तावर देशवासियांना शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी Xवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी म्हटले आहे की, ‘काल संपूर्ण देशाने लोहरीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला. तर आज काही लोक मकर संक्रांतीचा सणही मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. तसेच काही लोक उद्या हा सण साजरा करणार आहेत. सोबतच माघ बिहूचा सणही जवळ आला आहे.
तसेच पोंगलच्या शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा सण एक श्रेष्ठ भारताची भावना दर्शवतो. हे कृषी, समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक आहे. हा एक असा सण आहे जो केवळ भारताची समृद्ध संस्कृती आणि विविधता दर्शवत नाही तर आपण सर्व एका देशाचे नागरिक आहोत आणि आपण एकत्र काम केले पाहिजे याची आठवण करून देतो.
या सर्व पवित्र सणांसाठी मी सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो. हे सण सुगीच्या सणाचे प्रतीक आहेत. या सणांच्या माध्यमातून आपण आपली संस्कृती आणि परंपरा जिवंत ठेवूया आणि देशात बंधुभावाचे आणि सद्भावनेचे वातावरण कायम ठेवूया. यानिमित्ताने आपण सर्वांनी देशाची एकता आणि अखंडता मजबूत करण्याची शपथ घेतली पाहिजे, असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.