आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक तसेच अयोध्येतील राम मंदिर सोहळा याबाबतीत चर्चा व मंथन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची व भाजपाची आज बैठक होणार आहे. नागपूरच्या रेशीमबागेत असणाऱ्या स्मृती मंदिर परिसरात या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक तसेच अयोध्येतील राम मंदिर सोहळा याबाबतीत चर्चा व मंथन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची व भाजपाची बैठक सुरू आहे. नागपूरच्या रेशीमबागेत असणाऱ्या स्मृती मंदिर परिसरात या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत. देशामध्ये यावर्षी लोकसभेच्या निवडणूका होणार आहेत. तसेच काही कालावधीनंतर राज्यात देखील विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. केंद्रात पुन्हा एकदा भाजपने सरकार आणण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच लोकसभेच्या अनुषंगाने देखील राज्यात ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे ध्येय भाजपाने ठेवले आहे. तसेच देशात देखील ३०० च्या पुढे जागा जिंकण्याचे उद्दिष्ट पक्षाने ठेवले आहे.
या बैठकीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्याशी संबंधित २० संघटनांचे तसेच भाजपाचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीला भाजपाकडून देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित आहेत. केंद्राच्या व राज्याच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत त्या, या संघटनांच्या मते राज्यातील जनतेपर्यंत कशा पोचतील , त्याची माहिती कशी मिळेल, लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात या बैठीकीत मंथन केले जाणार आहे.