मुंबईमधील काळाचौकी परिसरात असणाऱ्या पालिकेच्या शाळेत आग लागल्याची घटना घडली. मुंबई महानगरपालिकेच्या बंद असलेल्या शाळेमध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला. एकामागोमाग ८ ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटातील आवाजामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. ऑक्सिजन सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची घटना समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
काळाचौकी परिसरात मुंबई महानगरपालिकेची एक बंद असलेली शाळा आहे. कोविडच्या साथीमध्ये या शाळेचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर ही शाळा बंद होती मात्र त्यातील ऑक्सिजन सिलेंडर देखील तसेच पडून होते. सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आग लागल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे. कोविद काळामध्ये लसीकरण केंद्रासाठी या शाळेचा वापर करण्यात आला होता.