पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर लक्षद्वीप विरूद्ध मालदीव असा वाद सुरू झाला. या वादामध्ये अनेक सेलिब्रिटींना पंतप्रधान मोदींना पाठिंबा देत मालदीवला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच आता दाक्षिणात्य सुपरस्टारने देखील या वादावर भाष्य केले असून मोठा निर्णय घेतला आहे.
तेलुगू सुपरस्टार नागार्जुनने लक्षद्वीप विरूद्ध मालदीव वादावर भाष्य करत मोठा निर्णय घेतला आहे. त्याने आता मालदीवची ट्रिप रद्द केली असून पंतप्रधान मोदींना पाठिंबा दिला आहे. नागार्जुनने आधी मालदीवला जाण्याचा निर्णय घेतला होता, पण मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर त्याने त्याचा निर्णय बदलला आहे.
संगीतकार एमएस किरावनीसोबत बोलताना नागार्जुन म्हणाला की, “मी 17 जानेवारी 2024 रोजी सुट्टीसाठी मालदीवला जाणार होतो. माझ्या कुटुंबियांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्यासाठी मी मालदीवला जाण्याचा निर्णय घेतला होता. पण आता मी माझी मालदीवची ट्रिप रद्द करत आहे. कारण मालदीवच्या काही नेत्यांनी मोदींवर जी टीका केली आहे ती खूप चूकीची आहे. त्यामुळे आम्ही मोदींचा अपमान खपवून घेणार नाही.”
https://twitter.com/VlKAS_PR0NAM0/status/1746455895276667376
पुढे नागार्जुनने म्हटले आहे की, मी मालदीवचा वाद सुरू नसताना अनेकदा तिथे गेलो आहे. पण आता पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीपची वेगळी ओळख करून दिली आहे. त्यामुळे नागार्जुनने आता मालदीवची ट्रिप रद्द करून लक्षद्वीपला जाण्याचा निर्णय घेतला आहे. तो पुढच्या आठवड्यात लक्षद्वीपला जाणार आहे.