अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला होणऱ्या राम लल्लाच्या अभिषेकाची तयारी जोरात सुरू आहे. या कार्यक्रमाबाबत देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. तर या राम मंदिरामुळे अयोध्येतील फक्त रस्ते वाहतूकच नाही तर विमानतळ पर्यटन उद्योगाला देखील चालना मिळत आहे. तर आता राम लल्लाच्या या खास अभिषेक सोहळ्यानिमित्त अयोध्येतील जवळपास सर्व हॉटेल्स 100 टक्के बुक झाली आहेत.
अयोध्या राम मंदिराच्या 170 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या लखनौ, प्रयागराज आणि गोरखपूरमध्ये हॉटेल्सची मागणी झपाट्याने वाढली आहे. मनीकंट्रोलशी बोलताना, सिग्नेट हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सचे एमडी आणि संस्थापक म्हणाले की, त्यांच्या हॉटेलच्या सर्व खोल्या या महिन्यासाठी बुक केल्या गेल्या आहेत. हॉटेलमधील खोल्यांचे सरासरी भाडे 85 हजारांच्या पुढे गेले आहे.
सिग्नेट कलेक्शन KK ने अयोध्येतील सर्व हॉटेल्सच्या 45% खोल्या मंदिर ट्रस्टसाठी बुक केल्या आहेत जेणेकरून VIP लोकांना तिथे राहता येईल. सिग्नेट कलेक्शन केके हॉटेलच्या सर्व खोल्या या महिन्यासाठी आधीच बुक केल्या आहेत. त्यांची प्रत्येक खोली सुमारे 85 हजार रुपये किमतीत आहे. तर Radisson’s Park Inn हॉटेल लाँच झाल्यानंतर लगेचच तिथे बुकिंगसाठी गर्दी झाली आहे. तर या हॉटेलच्या सर्व खोल्या 21-22 जानेवारीसाठी बुक केल्या गेल्या आहेत.
दरम्यान, राम मंदिराच्या उद्घाटनानंतर वाढत्या पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी नुकतेच पुनर्विकसित अयोध्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले आहे. यासोबतच महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळावरही सेवा सुरू झाली आहे.