मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी -शाही ईदगाह मशीद वादाच्या संदर्भात
अलाहाबाद न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. शाही ईदगाह मशिदीसाठी अयोग्य
नेमण्याचे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिले होते. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या
आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने शाही
ईदगाह मशिदीसाठी आयोग नेमण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान
देणाऱ्या मॅनेजमेंट ट्रस्ट शाही मस्जिद इदगाहच्या समितीने दाखल केलेल्या याचिकेवर
संबंधित प्रतिवादींना नोटीसही बजावली. या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ जानेवारीला होणार आहे. तसेच ट्रायल
कोर्टासमोरील कार्यवाही सुरु ठेवली जाऊ शकते मात्र पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत
आयोगाची अंमलबजावणी करता येणार नाही असे न्यायालयाने सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने सर्वांगीण निर्देश मागणाऱ्या अस्पष्ट अर्जावर
कारवाई केल्याचे निरीक्षण नोंदवले. अर्ज हा विशिष्ठ असणे आवश्यक आहे. ”हे चुकीचे आहे, तूम्हाला काय हवे आहे याबद्दल तुम्हाला
स्पष्टपणे सांगावे लागेल. हा सर्वव्यापी अर्ज आहे”, असे न्यायालायने म्हटले आहे.
मॅनेजमेंट ट्रस्ट शाही इदगाह समितीने शाही ईदगाह मशिदीसाठी आयोग
नेमण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले
आहे. भगवान
श्री कृष्ण लल्ला विराजमानचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अधिवक्ता रीना एन. सिंग यांनी
एएनआयशी बोलताना सांगितले, ”आज
न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या सर्वेक्षणाच्या आदेशाबाबद सुनावणी केली, ज्याला मुस्लिम पक्षकारांनी आव्हान
दिले होते. इंतेजामिया समितीने या आदेशाला
आव्हान दिले होते, त्यावर
आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाने केवळ सर्वेक्षणाच्या
आदेशाला स्थगिती दिली आहे, मूळ
खटल्याला स्थगिती दिलेली नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयात खटला सुरूच राहणार असून, पुढील सुनावणी २३ जानेवारी रोजी आहे.”