आरएसएस आणि भाजपने अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला होणारा कार्यक्रम “संपूर्णपणे राजकीय कार्यक्रम” बनवला आहे, असे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएससाठी आयोजित ह्या राजकीय कार्यक्रमात जाणे कठीण वाटत आहे, असे राहुल गांधी म्हणाले आहेत .
भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान पत्रकार परिषदेला संबोधित करणारे राहुल गांधी म्हणाले की, “आरएसएस आणि भाजपने 22 जानेवारीच्या कार्यक्रमाला पूर्णपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रम बनवला आहे.आणि त्यामुळेच मला वाटते की काँग्रेस अध्यक्षांनी या सोहळ्याला जाण्यास नकार दिला असावा.
मी धर्माच्या तत्त्वांनुसार जगण्याचा प्रयत्न करतो. मी लोकांशी चांगले वागतो आणि त्यांचा आदर करतो. मला काही बोलले की मी उद्धटपणे उत्तर देत नाही, मी त्यांचे ऐकतो, मी द्वेष पसरवत नाही. माझ्यासाठी हा हिंदू धर्म आहे. मी त्याचे पालन करतो. आयुष्यात. पण मला ते माझ्या शर्टवर घालायची गरज नाही. ज्यांचा यावर विश्वास नाही त्यांनी तो शर्टावर घालायला हवा,” असेही स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी दिले आहे.