अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयोवा कॉकस निवडणुकीत आपले वर्चस्व सिद्ध पुन्हा एकदा सिद्ध केले आहे, तर अमेरिकेतील भारतीय वंशांचे विवेक रामास्वामी जे रिपब्लिकन पक्षातून उमेदवारीबाबत इच्छूक होते त्यांनी राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयोवा कॉकसमध्ये अभूतपूर्व फरकाने मोठा विजय नोंदवला आहे आणि त्यांनी पक्षावर तसेच त्यांच्या समर्थकांवर असलेली पकड दाखवून दिली आहे.
ट्रम्प यांनी आयोवामधून ४० पैकी २० प्रतिनिधींवर ५६,२५० मतांसह विजय मिळवला आहे. रिपब्लिकन पक्षातून विवेक रामास्वामी राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी इच्छूक होते. तर, डोनाल्ड ट्र्म्प यांच्यासह अजून सहाजणही या शर्यतीत होते.
जर मी सत्तेत आलो तर अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या परदेशी नागरिकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात येईल. तसेच अवैधरित्या राहत असलेल्या प्रवाशांवर कारवाई केली जाईल., अशी घोषणा रामास्वामी यांनी केल्यामुळे ते बरेच चर्चेत आले होते.