बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आणि ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांची जोडी लोकप्रिय आहे. तर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यामुळे ते दोघे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. पण आता धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लेक ईशा देओल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे.
ईशा देओल तिच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आली आहे. ईशा आणि तिचा पती भरत तख्तानी यांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याची माहिती समोर आली आहे. लवकरच ईशा आणि भरतचा घटस्फोट होणार असल्याचे म्हटले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ईशाचा पती भरतचे विवाहबाह्य संबंध असल्याचे म्हटले जात आहे. भरतची गर्लफ्रेंड ही बंगळूरमध्ये राहत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे ईशा भरतला घटस्फोट देणार असल्याचे म्हटले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून ईशा आणि भरत कोणत्याही इव्हेंट, पार्टीमध्ये एकत्र दिसून आलेले नाहीयेत. तसेच त्यांनी सोशल मीडियावर त्यांचे एकमेकांसोबतचे फोटोही शेअर केलेले नाहीयेत. त्यामुळे ते दोघे एकमेकांपासून विभक्त होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, 29 जून 2012 रोजी ईशा आणि भरत लग्नबंधनात अडकले होते. तर त्या दोघांना राध्या आणि मिराया अशा दोन मुली आहेत. पण आता त्या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे ईशाच्या चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.