येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. त्यानिमित्ताने देशामध्ये आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे. या सोहळ्यासाठी अनेक प्रमुख व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले आहे. राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक, अभिनय क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले आहे. राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण आरजेडी पक्षाचे प्रमुख व बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव यांना देखील देण्यात आले आहे. मात्र, आपण २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे लालू यादव यांनी सांगितले.
”राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मी अयोध्येला जाणार नाही असे लालू प्रसाद यादव यांनी सांगितले.” तसेच कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचे कोणतेही कारण त्यांनी सांगितले नाही. २२ जानेवारीला अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेते सामील होणार आहेत. या सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रेटी आणि नामवंत व्यक्तींनाही आमंत्रित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अयोध्येतील राम लल्लाच्या ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्याचे निमंत्रण नाकारले असून, कार्यक्रमानंतर आणि बांधकाम पूर्ण झाल्यावर दर्शनासाठी येणार असल्याचे सांगितले. बुधवारी रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांना लिहिलेल्या पत्रात पवार यांनी सांगितले आहे.
शरद पवार यांनी लिहिलेल्या पत्रात ”शरद पवार यांनी देशभरातील कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेची कबुली देत त्यांनी ”मर्यादा पुरुषोत्तम श्री राम हे भारतातील आणि देशभरातील कोट्यवधी भाविकांच्या उपासनेचे आणि भक्तीचे प्रतीक आहे. देशभरातील भाविकांमध्ये उत्साह आहे. सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने मंदिरात पोहोचत आहेत.२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे,” असे पवार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.