अयोध्येतील रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला फक्त 5 दिवस राहिले आहेत. त्यामुळे अयोध्येत जोरदार तयारी सुरू आहे. तसेच या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी करोडो राम भक्त आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, या खास सोहळ्यानिमित्त अनेक रामभक्त अनोख्या पद्धतीने आपली भक्ती दाखवत आहेत. यामध्ये आता एका तरूणाने त्याच्या कलेतून रामभक्ती दाखवली आहे.
पश्चिम बंगालमधील एका तरूणाने 20 किलो पार्ले-जी बिक्सिटांपासून राम मंदिराची अप्रतिम अशी प्रतिकृती बनवली आहे. छोटन घोष असे या तरूणाचे नाव आहे. या तरूणाला राम मंदिराची 4 बाय 4 फुटांची प्रतिकृती बनवण्यासाठी पाच दिवस लागले. ही प्रतिकृती बनवताना त्याने बिस्किटांसोबतच थर्माकोल, फेव्हीकोल आणि प्लायवूड या वस्तूंचाही वापर केला आहे.
या तरूणाचा बिस्किटांपासून राम मंदिराची प्रतिकृती बनवतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच नेटकऱ्यांनी त्याचे कौतुक देखील केले आहे.
https://twitter.com/rose_k01/status/1747410223042801746
दरम्यान, या तरूणाप्रमाणेच आपली रामभक्ती दाखवण्यासाठी काही जण रामाच्या दर्शनासाठी पायी निघाले आहेत. तर काहींनी राम मंदिर थीम असलेला केक तयार करून आपली भक्ती दाखवली आहे.