ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण आज त्यांच्या घरी एसीबीची टीम पोहोचली आहे. राजन साळवी यांच्या रत्नागिरी येथील निवासस्थानी एसीबीकडून झाडाझडती सुरू आहे. तर आता अधिकाऱ्यांनी साळवींच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी सुरू केली आहे.
आज (18 जानेवारी) सकाळी दहा वाजता एसीबीचे अधिकारी राजन साळवी यांच्या घरी आणि हॉटेलमध्ये पोहोचले. मुख्यमंत्री कार्यालयाकडून आदेश आल्यानंतर चौकशी करण्यासाठी एसीबीचे 18 ते 20 अधिकारी आले आहेत. तर आता अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे.
काही दिवसांपूर्वीच एसीबीकडून राजन साळवींची चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी एसीबी कार्यालयाच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राजन साळवींचा बंगला आणि रत्नागिरीतील त्यांचे हॉटेलचे मूल्यांकन करण्यात आले होते.
तर एसीबीच्या या छापेमारीबाबत राजन साळवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मी या चौकशीला सामोरे जायला तयार आहे. कारण या चौकशीला मी घाबरत नाही. ज्या दिवशी मला पहिली नोटीस आली होती त्याच दिवशी चौकशीला सामोरे जाण्यासाठीची माझी मानसिकता तयार झाली होती. त्यामुळे या चौकशीला मी सामोरे जाणार आहे.