अयोध्येतील रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला फक्त 4 दिवस राहिले आहेत. त्यामुळे अयोध्येत जोरदार तयारी सुरू आहे. तर आता अयोध्येत प्रभू रामलल्लाचे प्राण प्रतिष्ठा पूजन आणि विधींचा टप्पा सुरू झाला आहे. तसेच आज (18 जानेवारी) मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यामुळे आज अनेक प्रकारचे विधी आणि पूजा केल्या जाणार आहेत.
तर काल (17 जानेवारी) रात्री राम मंदिर परिसरात रामलल्लाची मूर्ती क्रेनद्वारे आणण्यात आली. त्यानंतर आज गर्भगृहात रामलल्लाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
आज देखील रामलल्लाची विशेष पूजा होणार आहे. कार्यक्रमानुसार आज शुभ मुहूर्तानुसार प्रधान संकल्प, गणेशांबिका पूजन, वरुण पूजन, चतुर्वेदोक्त, पुण्यवचन, मातृकुपूजन, सोरधारा पूजन, आयुषमंत्र जप, नंदीश्राद्ध, आचार्य धिरित्वविग्वरण, मधुपर्क पूजन, मंगळसूत्र पूजन , पंचगव्यप्रदर्शन , मंडपंगवस्तु पूजन , वास्तु बलिदान , मंडप सूत्र स्थापन , दूध धार, पाणी, सुव्यवस्थित षोडशस्तंभ पूजा , मंडप पूजन , जलाधिवास , गांधादिवास संध्याकाळची पूजा व आरती होणार आहे.
श्री राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, रामलल्लाची मूर्ती आत आणण्यापूर्वी गर्भगृहात विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. क्रेनच्या सहाय्याने मूर्ती मंदिरात आणण्यात आली होती. मंदिराच्या गर्भगृहात श्री रामलल्ला यांचे सिंहासन तयार करण्यात आले असून, त्याची उंची 3.4 फूट आहे. या सिंहासनावर प्रभूची बालस्वरूपाची उभी मूर्ती बसवण्यात येणार आहे.
https://twitter.com/vikasbha/status/1747684216416981321
दरम्यान, अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याशी संबंधित विधींना कालपासून सुरवात झाली. प्रायश्चित्त पूजेने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची औपचारिक सुरुवात करण्यात आली. बहुप्रतीक्षित अश्या ह्या अयोध्येतील नवीन मंदिरात प्रभू श्रीरामाचे बालस्वरुप म्हणजे रामलल्लांनी नव्या मंदिर परिसरात विधीपूर्वक प्रवेश केला.