सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२३ वा पदवीप्रदान सोहळा मोठ्या
उत्साहात पार पडला. या सोहळ्याला माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे प्रमुख अतिथी
म्हणून उपस्थित होते. पुणे विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांमधून उत्तीर्ण
झालेल्या पदवी व पदव्यत्तर अशा एकूण १ लाख ५ हजार ६५४ विद्यार्थ्यांना पदवी
प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले . त्यामध्ये १८७ विद्यार्थ्यांना पीएचडी
प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तर १५ जणांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या
पदवीप्रदान सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे उपस्थित
होते. त्याशिवाय राज्यपाल रमेश बैस, कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी,
प्र.
कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, परीक्षा
व मूल्यमापन मंडळाचे डॉ. महेश काकडे व आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी
राज्यपाल रमेश बैस आणि प्रमुख अतिथी असलेले माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे
यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.