संपूर्ण जगभरामध्ये काही वर्षांपूर्वी कोरोना महामारीने हाहाकार माजवला होता. अजूनही त्यांचे नवनवीन व्हेरिएंट
उप्तन्न होता दिसून येत आहेत. मात्र कोरोना काळामध्ये मुंबई महापालिकेमध्ये कथित
खिचडी घोटाळ्याचे प्रकरण समोर आले होते. या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने सुरज
चव्हाण यांना अटक केली आहे. सूरज चव्हाण हे ठाकरे गटाचे आमदार व उद्धव ठाकरे यांचे
सुपुत्र आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. सुरज चव्हाण यांनी आदित्य
ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून देखील जबाबदारी सांभाळली आहे.
सुरज चव्हाण हे ठाकरे गटाचे सचिव म्हणून कार्यरत होते. मुंबई
महापालिकेतील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने याआधी सुरज चव्हाण यांची चौकशी
केली होती. आदित्य ठाकरेंची कोणतेही संघटनात्मक रणनीती आखण्यात सुरज चव्हाण यांची
महत्वाची भूमिका असते. दरम्यान सुरज चव्हाण यांना काल ईडीने अटक केली आहे. आज ईडी
त्यांना कोर्टात हजर करणार असून, ईडी त्यांच्या कोठडीची मागणी
कोर्टासमोर करणार आहे. तसेच कोर्टात हजर करण्यापूर्वी ईडी त्यांची वैद्यकीय तपासणी
देखील करणार आहे.