केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आसाम, मेघालय या तीन दिवसीय दौऱ्याला आजपासून सुरुवात होत आहे.आज शिलाँगमध्ये आल्यानंतर अमित शाह शिलाँगमधील आसाम रायफल्सच्या मुख्यालयाच्या आवारात आसाम रायफल्सच्या सायबर-सुरक्षा ऑपरेशनल केंद्राचे उद्घाटन करतील.
त्यानंतर ते राज्य कन्व्हेन्शन सेंटर, शिलाँग येथे नॉर्थ ईस्टर्न कौन्सिल (NEC) च्या 71 व्या पूर्ण सत्राला उपस्थित राहतील आणि शुक्रवार, 19 जानेवारी रोजी नॉर्थ ईस्टर्न स्पेस ऍप्लिकेशन सेंटर (NESAC) च्या कामकाजाचा आढावा घेतील.
20 जानेवारी रोजी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आसामला भेट देतील आणि SSB चा 61 वा स्थापना दिन आणि आसाम पोलिस कमांडोंच्या पासिंग आऊट परेडसह अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेतील. तसेच तेजपूर येथील एसएसबी संकुलात एसएसबीच्या 61 व्या स्थापना दिन सोहळ्याला उपस्थित असतील.
त्याच दिवशी ते सोनितपूर जिल्ह्यातील ढेकियाजुली येथे ऑल बाथौ महासभेच्या 13 व्या त्रैवार्षिक परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
याचबरोबर गुवाहाटी येथील सरूसजाई स्टेडियममध्ये 2,551 आसाम पोलिस कमांडोच्या पासिंग आऊट परेडला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हजर असतील असे सांगण्यात आले आहे.
यानंतर गुवाहाटी येथील श्रीमंत शंकरदेव आंतरराष्ट्रीय सभागृहात “आसामचे ब्रेव्हहार्ट लचित बारफुकन” या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यानंतर ते गुवाहाटीमध्ये ब्रह्मपुत्रा रिव्हरफ्रंटचे उद्घाटन करणार आहेत.