येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत भव्य राम मंदिराचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. २२ तारखेला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. ही मूर्ती कर्नाटकमधील अरुण योगिराज यांनी साकारली आहे. या सोहळ्याला अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. अयोध्येमध्ये राम राम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाल्याने देशामध्ये जल्लोषाचे आनंदाचे वातावरण हे. प्रत्येक जण प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाण्यासाठी आतुर आहेत. २२ तारखेनंतर अयोध्येतील राम मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे. रामभक्तांना सहज अयोध्येमध्ये पोहोचता यावे यासाठी रेल्वे प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. रामभक्तांसाठी पुण्यातून जवळपास १५ रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. रेल्वे प्रशासनाने ३० जानेवारीपासून पुणे ते अयोध्येसाठी पुण्यातून सोडण्यात येणार आहेत.
भारतीय रेल्वेने रामभक्तांसाठी विशेष ट्रेन चालवण्याचे ठरवले आहे. त्यानिमित्त ३० जानेवारी पासून पुणे ते अयोध्या १५ रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. या सर्व रेल्वे गाड्या स्लीपर कोच असणार आहेत. एका गाडीतून सुमारे दीड हजार प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. लवकरच याचे बबुकिंग सुरु केले जाणार आहे. या १५ गाडयांना कसा प्रतिसाद मिळतो ते पाहून गाड्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. देशभरातून सुमारे २०० रेल्वे गाड्या अयोध्येकडे धावणार असल्याचे भारतीय रेल्वेने सांगितले आहे.