स्टार्ट अप्सची (नवीन व्यवसाय सुरू करण्याची) संस्कृती देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावी, यासाठी 16 जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय स्टार्टअप’ दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा 15 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधान मोदींनी केली.
नवोन्मेष, उद्योजकता आणि स्टार्ट अप व्यवस्था सुदृढ करण्यासाठी सरकार जे मोठ्या प्रमाणावर बदल करत आहे, त्याचे तीन महत्वाचे पैलू आहेत –
*पहिला* , उद्योजकतेला, नवोन्मेषी प्रयोगांना सरकारी प्रक्रियांच्या जंजाळातून, प्रशासनाच्या विळख्यातून मुक्त करणे
*दुसरा* , नवोन्मेषी वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा निर्माण करणे
*तिसरा* , नवोन्मेषी युवकांना, युवा उद्योगपतींना मदतीचा हात देणे.
स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया सारखे कार्यक्रम अशाच प्रयत्नांचा भाग आहेत. 16 जानेवारी 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप इंडिया उपक्रम सुरू केला होता. म्हणून त्याच दिवशी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस साजरा केला जातो.
या अंतर्गत 10 ते 18 जानेवारी हा संपूर्ण आठवडा कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. जो *innovation week* म्हणून साजरा केला जात आहे.
स्टार्टअप इंडिया कार्यक्रमामुळे 2016 मध्ये 400 नवीन व्यवसाय सुरू झाले. तेंव्हापासून 2023 मध्ये 1,17,000 नवीन व्यवसाय सुरू झाले, इथपर्यंत भारताची प्रगती झाली आहे.
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत