येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद मोदी करणार आहेत. प्रभू श्रीराम आपल्या भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. या सोहळ्याला या सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक घोषणा केली आहे. राम मंदिराच्या सोहळ्यानिमित्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे मिळणार आहे. याबाबतची घोषणा केंद्र सरकारने केली आहे.
केंद्र सरकारने २२ जानेवारी रोजी राम मंदिराच्या सोहळ्यानिमित्त देशातील केंद्र सरकारची कार्यालये, केंद्रीय संस्था , केंद्रीय औद्योगिक संस्था दुपारी २.३० वाजेपर्यंत बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.
यापूर्वी या सोहळ्यासाठी अनेक ठिकाणी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अनेक राज्यांनी देखील शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान, राम मंदिराच्या सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. या सोहळ्याला राजकीय, खेळ, अभिनय, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींना निमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये रजनीकांत, अनुष्का शर्मा, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सध्या अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या अनुष्ठानाला सुरुवात झाली आहे. विवध कार्यक्रम या दिवसांमध्ये साजरे केले जाणार आहेत. कलश यात्रा देखील अयोध्येत पोहोचली आहे. रामलल्लाची मूर्ती गर्भगृहात बसवण्यात येणार आहे. यासाठी शरयू नदीच्या पाण्याने गर्भगृह स्वच्छ करण्यात आले आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरात रामलल्ला प्रवेश करणार आहेत. अयोध्येतील रामलल्ला यांची मूर्ती कर्नाटकमधील शिल्पकार अरुण योगिराज यांनी साकारली आहे.