आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले . पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोलापूरच्या नगर कुंभारी येथील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत असंघटित कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण केले. या योजनेची माहिती माकप नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री असा उल्लेख केला. मात्र आपली चूक लक्षात येताच त्यांनी दुरुस्ती केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सोलापूर दौऱ्यावर आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सोलापुरी चादर आणि अन्य भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मंचावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मंत्री, खासदार आणि आमदार उपस्थित होते. यावेळी घरकुल योजनेची माहिती देण्यासाठी नरसय्या आडम हे मंचावर उभे राहिले. सर्वांचे स्वागत करत असताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ऐवजी उद्धव ठाकरेंचे नाव घेतले. मात्र ही कूक त्यांच्या लक्षात येताच त्यांनी जाहीर माफी मागितली व आपल्या वाक्यांची दुरुस्ती देखील केली. मात्र त्यांच्या या वक्तव्याची सभास्थळी जोरदार चर्चा पाहायला मिळाली.