पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे लोकार्पण केले. तसेच यांनतर त्यांनी सभेला संबोधित केले. यावेळी आपल्या भाषणातून त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. घरकुलांचे लोकार्पण कार्यम्त बोलताना मोदी यांनी अनेक विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच काही क्षणासाठी सभेला संबोधित करताना मोदी भावुक देखील झाले होते.
सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”जेव्हा मी या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यासाठी आलो होतो, तेव्हा मी तुम्हाला गॅरंटी दिली होती की, तुमच्या घरांच्या किल्ल्या देण्यासाठी देखील मी स्वतः येईन. आज मोदीने ही गॅरंटी पूर्ण केली आहे. तुम्हाला तर माहितीच आहे मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी. आता लाखो रुपयांची घरे ही तुमची संपत्ती आहे ”, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
२२ जानेवारी हा दिवस आपल्यासाठी ऐतिहासिक क्षण आहे. आपले प्रभू श्रीराम त्यांच्या मंदिरात विराजमान होणार आहेत. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी साधना करणार आहे. तुमच्या आशीर्वादाने मी तिकडे जाणार आहे. माझ्या अनुष्ठानाची सुरुवात नाशिकच्या पंचवटीमधून झाली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. यावेळी त्यांनी पंढरपूरचा विठ्ठल आणि सोलापूरचे सिद्धेश्वर महाराज यांना नमस्कार देखील केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोलापूरच्या नगर कुंभारी येथील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत असंघटित कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण केले.