येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या खास सोहळ्याला फक्त 3 दिवस राहिले आहेत. त्यामुळे संपूर्ण जगभरात उत्साहाचे वातावरण आहे. तर या सोहळ्यानिमित्त अनेक गायक-गायिकांनी श्रीरामाला समर्पित गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आणली आहेत. तसेच या श्रीरामावर आधारित गाण्यांना प्रेक्षकांनी देखील चांगलीच पसंती दर्शवली आहे. विशेष म्हणजे या गाण्यांची दखल पंतप्रधान मोदींनी देखील घेतली आहे.
नुकतीच पंतप्रधान मोदींनी मराठी गायिका आर्या आंबेकर आणि गायक सुरेश वाडकर यांनी गायलेल्या एका गाण्याची दखल घेतली आहे. ‘हृय में श्रीराम’ या गाण्याची दखल घेत मोदींनी आर्या आंबेकर आणि सुरेश वाडकर यांचे कौतुक केले आहे. मोदींनी X वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आर्या आणि सुरेश वाडकर यांच्या ‘हृदय में श्रीराम’ या गाण्याची लिंक शेअर केली आहे.
तसेच या गाण्याची लिंक शेअर करत पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे की, “अयोध्येत होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यामुळे संपूर्ण देश भगवना श्रीरामाच्या भक्तीच्या रंगात रंगला आहे. तसेच सुरेश वाडकर आणि आर्या आंबेकर यांनी त्यांच्या मधुर आवाजात ही भावना व्यक्त केली आहे.”
https://twitter.com/narendramodi/status/1748164014180573571
पंतप्रधान मोदींनी गाण्याची दखल घेतल्यानंतर आर्या आंबेकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. तिने पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, “जय श्रीराम, मी ज्यांच्या कार्याने प्रभावित होते असे माननीय पंतप्रधान मोदी यांच्या पोस्टने माझ्या डोळ्यात पाणी आले. असा आनंद मी कधीच अनुभवला नाही. हा आनंद फक्त शब्दात मांडता येणार नाही. आमचा हा खारीचा वाटा, ही सांगीतिक सेवा श्रीराम चरणी रुजू झाली, प्रत्यक्ष श्रीरामाचा आशीर्वाद जणू आमच्या पर्यंत पोचला, अशी भावना मनात निर्माण झाली.”
“प्रिय मोदीजी, 22 जानेवारीला होणारा खास दिवस साजरा करण्यासाठी आमच्या या छोट्याशा योगदानाची दखल घेतल्याबद्दल तुमचे मन:पूर्वक आभार. मी नेहमी तुमच्या पावलांवर पाऊल ठेवण्याचा आणि गाण्याच्या माध्यमातून माझ्या स्वत:च्या मार्गाने देशसेवा करण्याचा प्रयत्न करेन. मोदीजी, मी अत्यंत आदराने नतमस्तक होऊन तुमच्या चरणांना स्पर्श करून तुमचा आशीर्वाद घेते”, असेही आर्याने म्हटले आहे.
https://www.instagram.com/p/C2RGobwoiWP/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, ‘हृदय में श्रीराम’ आर्या आणि संदीप वाडकर यांनी गायले आहे. तर संदीप खरे यांनी हे गाणे लिहिले आहे. तर सलील कुलकर्णी यांनी ते संगीतबद्ध केले आहे.