पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या तामिळनाडूच्या दौऱ्यावेळी चेन्नईमधील लोकप्रिय जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये ‘खेलो भारत युथ गेम्स २०२४’ आहेत. हे खेलो भारत युथ गेम्स २०२४ दोन आठवडे सुरु राहणार आहेत. याची सुरुवात आज पंतप्रधान मोदी करणार आहेत. ही स्पर्धा १९ ते ३१ जानेवारी पर्यंत होणार आहे. या स्पर्धेत २५ खेळांमध्ये ५,५०० पेक्षा जास्त खेळाडू भाग घेणार आहेत. या स्पर्धेसाठी पंतप्रधान मोदी येणार आहेत. त्यानिमित्ताने चेन्नई शहरामध्ये चोख आणि कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पंतप्रधान ज्या-ज्या ठिकाण जाणार आहेत त्यात ठिकाणी ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच सुरक्षेसाठी संपूर्ण शहरात २२ हजार सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.
अतिरिक्त सुरक्षेच्या कारणास्तव कंत्राटी कर्मचाऱ्यांना चेन्नई विमानतळाच्या धावपट्टीवर प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. विमानतळ परिसरात ओळखपत्र वापरून फक्त नियमित कर्मचाऱ्यांना प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या स्पर्धेच्या उदघाटनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी चेन्नई विमानतळावर येणार आहेत. नंतर ते हेलिकॉप्टरने INS अड्यार कडे जाणार आहेत. तेथून हे या स्पर्धेच्या उद्घटनाआधी खुल्या वाहनातून जवाहरलाल स्टेडियमकडे रवाना होणार आहेत. पंतप्रधानांचा ताफा सुरक्षितपणे उचित स्थळी पोहोचावा यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.