इराण आणि पाकिस्तान यांच्यातील तणावादरम्यान, अमेरिकेला त्याबाबत चिंता वाटत असून त्यांनी या दोन्ही राष्ट्रांना सर्व बाजूंनी संयम ठेवण्याचे आवाहन आम्ही केले आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्र विभाग मॅथ्यू मिलर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले आहे.
इराणमध्ये हल्ले करण्यापूर्वी पाकिस्तानने अमेरिकेशी सल्लामसलत केल्याचा दावा करणाऱ्या काही मीडिया रिपोर्ट्सबाबत पत्रकारांनी विचारले असता “माझ्याकडे याबाबतचे कोणतेही खाजगी संभाषण नाही”.असेही मिलर म्हणाले आहेत. आम्ही पाकिस्तान आणि इराण यांच्यातील संघर्ष रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या राजनैतिक प्रयत्नांमध्ये गुंतलो आहोत. आम्ही पाकिस्तान आणि त्याच्या शेजारी देशांमधील सहकार्य संबंधांच्या वाढीसाठी प्रयत्नशील आहोत. तसेच ,पाकिस्तान सरकारने दिलेल्या याबाबतच्या टिप्पण्या आम्ही लक्षात घेतल्या आहेत. असेही ते पुढे म्हणाले आहेत.
“आपण अनेक वर्षांपासून इराणला हमासचा प्रमुख समर्थक म्हणून पाहिले आहे. ते हिजबुल्लाचे प्रमुख निधी देणाऱ्यांपैकी एक आहेत. प्रादेशिक अस्थिरता वाढवण्यासाठी इराणने केलेल्या कृतींचे परिणाम आम्ही पाहिले आहेत. आणि म्हणूनच आम्ही इराणला स्पष्ट संदेश पाठवत आहोत की हे दोन्ही राष्ट्रांमधला हा लढा कोणत्याही प्रकारे, स्वरूपात वाढू नये .
तसेच . अमेरिकेचे पाकिस्तान हे एक प्रमुख बिगर नाटो सहकारी राष्ट्र आहेआणि ते तसेच राहील, परंतु आम्ही या प्रकरणात पाकिस्तानलाही संयम ठेवण्याचे आवाहन करू असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हंटले आहे.