पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी तिरुचिरापल्ली येथे भेट दिली. पंतप्रधानांचे आगमन या ठिकाणी झाल्यानंतर नागरिकांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. या ठिकाण पंतप्रधान मोदींनी श्री रंगनाथस्वामी मंदिराला भेट देऊन पूजा देखील केली. श्रीरंगनाथ स्वामी हे एक हिंदू मंदिर आहे. भगवान विष्णूंच्या मंदिरांपैकी हे एक महत्वाचे मंदिर आहे. श्रीरंगम मंदिर हे भारतातील सर्वात मोठे मंदिर परिसर असणारे व जगातील सर्वात मोठ्या धार्मिक संकुलांपैकी एक आहे. हे मंदिर विजयनगर काळामध्ये बांधले गेल्याचे सांगितले जाते.
पंतप्रधान मोदींनी पारंपरिक वेषामध्ये या मंदिरात प्रवेश केला. तसेच या ठिकाणी विधिवत पूजा देखील केली यावेळी तेथील एका हत्तीने मोदींनी आशीर्वाद देखील दिला. मागील काही दिवसांपासून पंतप्रधानांनी अनेक मंदिरांना भेट दिली. या यात्रेदरम्यान ते ज्या ठिकाणी भेट देतात त्या ठिकाणी मंत्रोच्चारामध्ये भाग घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. श्रीरंगनाथ स्वामी मंदिरात देखील मोदींनी असच प्रकारे मंत्रोच्चारामध्ये भाग घेतला.
दरम्यान, रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेला अवघे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. २२ तारखेला पंतप्रधान मोदी राम मंदिराचे लोकार्पण करणार आहेत. त्यानंतर सर्व सामान्य नागरिकांना रामलल्लाचे दर्शन घेता येणार आहे. या सोहळ्यानिमित्त अनेकराजकीय, सांस्कृतिक, क्रीडा आणि अन्य क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. संपूर्ण देशात रामभक्तांमध्ये आनंदाचे, जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अयोध्या नागरी प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे.