अयोध्येत नव्याने बांधण्यात आलेल्या भव्य राम मंदिरात रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी रोजी होणार आहे. अरुण योगीराज यांनी साकारलेली भगवान मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात ठेवण्यात आली आहे मात्र या मूर्तीचा पहिला फोटो गुरुवारी गर्भगृहात स्थानापन्न समारंभात समोर आला.आणि त्यानंतर डोळे झाकलेल्या मूर्तीच्या फोटोनंतर आता पूर्ण चेहरा दिसणाऱ्या मूर्तीचे फोटो वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मात्र ह्या पार्श्वभूमीवर आपली नाराजी दर्शवत श्री राम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी आज असे सांगितले की, ‘प्राण प्रतिष्ठेच्या आधी राम लल्लाच्या मूर्तीचे डोळे प्रकट होऊ शकत नाहीत. ज्या मूर्तीमध्ये प्रभू रामाचे डोळे दिसू शकतात ती खरी मूर्ती नाही.आणि जर डोळे दिसले तर, डोळे कोणी उघड केले आणि मूर्तीचे फोटो कसे व्हायरल होत आहेत याचा तपास व्हायला हवा.
प्राणप्रतिष्ठेचे विधी पूर्णपणे पार पडल्यानंतर प्रभू श्रीरामांची मूर्तीचे दर्शन भक्तांना घेता येणार आहे.
आज 20 जानेवारीलादेशातील विविध नद्यांमधून आणलेल्या पाण्याने राम मंदिराचे गर्भगृह पावन केले जाणार आहे. यासाठी 81 कलशात पाणी भरून आणण्यात आले आहे, पाकिस्तानातून हिंगलाज शक्तीपीठाचे पाणी अयोध्येत पोहोचणार आहे.यासोबतच आज वास्तुशांती विधीही होणार आहे. वास्तुशांतीनंतर रामलल्ला सिंहासनावर विराजित होणार आहेत. याआधी सकाळी शक्रधिवास, फलाधिवास आणि सायंकाळी पुष्पाधिवास हे विधी पार पडणार आहेत.