अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडीओ नोव्हेंबर महिन्यात व्हायरल करण्यात झाला होता. त्या डीपफेक व्हिडीओ प्रकरणातील मुख्य आरोपीला आज दिल्ली पोलिसांनी आंध्र प्रदेशातून अटक केली आहे.
इंटेलिजेंस फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स (IFSO) युनिट ऑफ स्पेशल सेलच्या पोलिसांनी इमानी नवीन या २४ वर्षीय तरुणाला या प्रकरणात अटक केली आहे. ,ज्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मंदाना यांचे बनावट व्हिडीओ अपलोड केले होते. , या प्रकरणाची दखल केंद्रसरकार कडून घेतली गेली तसेच जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही या बद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला व्यक्ती, आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील रहिवासी असून, तो चेन्नईतील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी-टेक पदवीधर आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपीचा यापूर्वीही अनेक प्रकारच्या सायबर गुन्ह्यात सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे
पोलिस उपायुक्त, IFSO युनिट, हेमंत तिवारी यांनी सांगितले की नवीन हा रश्मिका मंदानासाठी फॅन पेज चालवत असे
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण तो खरा व्हिडिओ एका ब्रिटिश-इंडियन सोशल मीडिया इन्फ्यूएंसर जारा पटेलचा होता. पण AI च्या मदतीने तो व्हिडिओ डीपफेक करण्यात आला आणि त्या महिलेच्या जागी अभिनेत्री रश्मिका मंदानाचा चेहरा लावण्यात आला. याप्रकरणी रश्मिकाने दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान, कथित डीपफेक व्हिडिओंशी संबंधित 500 हून अधिक सोशल मीडिया अकाउंट्सचे विश्लेषण करण्यात आले.
“सायबर लॅबमध्ये व्हिडिओंचे विश्लेषण करण्यात आले. संशयित व्यक्तींचे सखोल विश्लेषण आणि चौकशी केल्यानंतर, शेवटी, इंस्टाग्रामवर आरोपीचे खाते शोधण्यात आले. आरोपीची ओळख पटवल्यानंतर, एक टीम आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे पोहोचली आणि त्यांनी इमानी नवीनला शोधून काढले ज्याने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली
संबंधित आरोपीकडून एक लॅपटॉप आणि तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.