अयोध्येत उद्या रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे या सोहळ्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. तसेच उद्या होणाऱ्या या खास सोहळ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. अशातच आज रामलल्लाचे 114 कलशांनी दिव्य स्नान होणार आहे. सोबतच विशेष पूजा आणि हवन देखील होणार आहे.
आज विशेष पूजा आणि हवनासोबतच रामलल्लाचे 114 कलशांनी दिव्य स्नान होणार आहे. त्यानंतर रामलल्लाच्या मंडपाची पूजा देखील होणार आहे. तसेच रामलल्लाच्या दिव्य स्नानानंतर शैयाधिवास प्रक्रिया पूर्ण होणार आहे म्हणजेच रामलल्लाच्या मूर्तीला पलंगावर झोपवले जाणार आहे.
तसेच आज श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या वतीने स्थापित देवतांची नित्य पूजा, हवन, 114 कलशांच्या विविध औषधी पाण्याने मूर्तीचे स्नान, पारायण आदी, पहाटे मध्वधिवास, महापूजा, उत्सवमूर्तीचा प्रसाद परिक्रमा, शैयाधिवास. , तत्लान्यास , महान्यास आदिन्यास , शांतिक-पोष्टिक , अघोर होम , व्याहती होम , रात्रीचा जागर , संध्याकाळची पूजा आणि आरती होणार आहे.
दरम्यान, 22 जानेवारी रोजी रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठापणेचा सोहळा रात्री 12:29 वाजून 8 सेकंदांनी सुरू होणार आहे. यावेळी प्राणप्रतिष्ठेचे विधीही वेगाने सुरू होतील. तर मूर्तीच्या अभिषेकानंतर भाविकांना रामलल्लाचे दर्शन घेता येणार आहे.