अयोध्येत उद्या (22 जानेवारी) रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला अनेक राजकीय नेते मंडळी, सेलिब्रिटी आणि विदेशी पाहुणे उपस्थित राहणार आहेत. तसेच उद्या होणाऱ्या या खास सोहळ्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. अशातच आता AI ने एक कमाल केली आहे.
AI ने चक्क भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजात ‘राम आयेंगे’ हे गाणे रेकॉर्ड केले आहे. AI ने या गाण्यातून लता दीदींना आदरांजली वाहिली आहे. सध्या या गाण्याला नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली असून सोशल मीडियावर हे गाणे चांगलेच व्हायरल होत आहे.
नुकताच युट्यूबवर संबंधित एआय वापरकर्त्याने लता दीदींच्या आवाजील ‘राम आयेंगे’ गाण्याचा ऑडिओ प्रदर्शित केला आहे. हा ऑडिओ पोस्ट करत त्याने म्हटले आहे की, हा नॉन कमर्शियल व्हिडीओ आहे. आपण हा ऑडिओ एआय आणि साऊंड इंजिनिअरिंगच्या मदतीने तयार केला आहे.
तसेच हा ऑडिओ संबंधित गायक, संगीतकार यांचा आदर ठेवून तयार करण्यात आलेला आहे. यामधून कोणत्याही प्रकारचा आर्थिक लाभ मिळवण्याचा आमचा उद्देश नाही, असेही ऑडिओ मेकर्सने स्पष्ट केले आहे.
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आवाजात राम आयेंगे गाणे ऐकण्यासाठी या लिंकवर क्लिक करा …
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदींनी लता मंगेशकर यांच्याबाबतची एक पोस्ट शेअर करुन त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला होता. 22 जानेवारीला संपूर्ण देश राम मंदिराच्या उद्घघाटन सोहळ्याच्या उत्साहात असेल. पण या सोहळ्याला लता दीदी नसतील याची खंत वाटत आहे. त्या आपल्यात नाहीत. अशा शब्दांत मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.