पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील श्री रंगनाथस्वामी मंदिरात प्रार्थना केली. गेल्या १० दिवसांपासून राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुष्ठान आरंभले आहे. या दरम्यान ते देशभरातील विशेषतः दक्षिण भारतातील विविध मंदिरांना भेटी देत आहेत. या अनुष्ठानाची सुरुवात त्यांनी नाशिक येथील काळा राम मंदिरात दर्शन घेऊन केली होती. उद्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर त्यांचे हे अनुष्ठान पूर्ण होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिरात कंब रामायणाचे श्लोक देखील ऐकले, जिथे महान कवी कंबन यांनी प्रथम त्यांचे रामायण सर्वांसमोर सादर केले होते.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“श्री रंगनाथस्वामी मंदिरात प्रार्थनेची संधी मिळाली. या मंदिराशी प्रभू श्री राम यांचा प्रदीर्घ काळापासून संबंध आहे. ज्या देवाची प्रभू श्रीरामांनीही पूजा केली, त्या देवाचा आशीर्वाद मिळाल्याबद्दल मला कृतकृत्य वाटत आहे.”
पंतप्रधानांनी मंदिरात कंब रामायणातील श्लोकही ऐकले.
“श्री रंगनाथस्वामी मंदिरात कंब रामायणाचे श्लोक ऐकणे हा अनुभव मी आयुष्यभर जतन करून ठेवेन. हे तेच मंदिर आहे जिथे महान कवी कंबन यांनी सर्वप्रथम त्यांचे रामायण सर्वांसमोर सादर केले होते, हे अधिक उल्लेखनीय आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कंब रामायणातील श्लोक ऐकले. ट्वीट पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा …