अयोध्या : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात पाहुणे येण्यास सुरुवात झाली आहे.या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन मंदिरात पोहोचले आहेत.
यावेळी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन ऑफ-व्हाइट कुर्ता पायजम्यामध्ये दिसले.या दोघांसोबत अभिनेत्री कंगना राणौत आणि दिग्दर्शक मधुर भांडारकरही मंदिराच्या आवारात पोहोचले आहेत.
अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यासह राम मंदिरात अनुपम खेर, जॅकी श्रॉफ, हेमा मालिनी, चिरंजीवी, राम चरण, आयुष्मान खुराना, माधुरी दीक्षित रजनीकांत,राजकुमार हिरानी, आम्रपाली दुबे, रणबीर कपूर, आलिया भट्ट, विकी कौशल, कंगना राणौत, कतरिना कैफ, जॅकी श्रॉफ आणि आशा भोसले यांसारखे बॉलिवूड सेलिब्रिटीही या सोहळ्यासाठी मंदिराच्या आवारात पोहोचले आहेत.
कडेकोट बंदोबस्तात अयोध्येतील मंदिरात आज प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संत आणि अनेक मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत राम लल्लाच्या ‘प्राण प्रतिष्ठा’चा ऐतिहासिक विधी होणार आहे.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने रविवारी जाहीर केले की, ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळा ‘मंगल ध्वनी’ या आकर्षक संगीत कार्यक्रमाद्वारे सुरू केला जाईल.तसेच अयोध्या मंदिरात श्री रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा दुपारी 12.30 वाजता होणार आहे.