पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण होणार आहे. तसेच शुभ मुहूर्तवर रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना देखील ते करणार आहेत. तब्बल ५०० वर्षानंतर देशवासीयांची स्वप्न पूर्ण होणार आहे. यासाठी अनेकांनी संघर्ष केला आहे. अनेकांनी आपले प्राण अर्पण केले आहेत. जगातील कोट्यवधी नागरिक या क्षणाचे साक्षीदार होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी या सोहळ्याबद्दल शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी एक विधान केले होते. मात्र सोहळ्याच्या आधी त्यांनी एक महत्वाचे विधान केले आहे. अपूर्ण मंदिरामध्ये प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा ही योग्य नसल्यचे त्यांचे म्हणणे होते. याला धर्माची मान्यता नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. आम्ही पंतप्रधान मोदी यांचे विरोधक नाही तर हितचिंतक आहोत , त्यामुळे आम्ही त्यांना शात्रोक्त कार्य करण्याचा सल्ला देत आहोत.
मात्र प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याआधी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी आपले सूर बदलले आहेत. आता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. ते म्हणाले ”आमचा मोदींना विरोध नाही. ते पंतप्रधान झाल्याने देशातील हिंदूंमधील स्वाभिमान जागा झाला आहे. आम्ही कोणावरही टीका करत नाहीये, तर आम्ही त्यांचे कौतुक करतोय. ”
दरम्यान, आता थोड्याच वेळात राम मंदिराचे लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. यासाठी निमंत्रित मान्यवर अयोध्येमध्ये दाखल झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील अयोध्येत दाखल झाले आहेत. दरम्यान अयोध्येत अत्यंत जल्लोषाचे वातावरण आहे. अयोध्यानगरीत अखंड रामनामाचा जप सुरु आहे. आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराला आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली आहे. आज दुपारी १२.१५ ते १२. ५० या वेळेत गर्भगृहात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. यासाठी केवळ ८४ सेकंदाचा मुहूर्त असल्याचे सांगण्यात येत आहे.