अयोध्येत आज पार पडत असलेल्या राम मंदिर सोहळ्यानिमित्त इस्राइलचे भारतातील राजदूत नाओर गिलन यांनी सर्व भारतवासीयांना शुभेच्छा दिल्या आहे. राम मंदिराला भेट देण्यासाठी आपण इच्छूक असल्याचे ते म्हणाले आहेत.
“राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या या शुभ प्रसंगी भारतीय जनतेला हार्दिक शुभेच्छा… जगभरातील रामभक्तांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आणि अविस्मरणीय असणार आहे असे ते म्हणाले आहेत.
“मी लवकरच अयोध्येतील राम मंदिर पाहण्यासाठी उत्सुक आहे; माझ्याकडे असलेल्या या मॉडेलपेक्षा ते नक्कीच अधिक भव्य आणि सुंदर असेल,” असे गिलॉनने पुढे लिहिले आहे . राम मंदिराच्या लघु प्रतिकृतीसह त्यांचे स्वतःचे छायाचित्र शेअर केले आहे.