अयोध्येतील बहुप्रतिष्ठित राम मंदिर पुर्ननिर्माण आणि प्रभू श्रीरामांची त्यात होत असलेली प्राणप्रतिष्ठा यानिमित्ताने देशाबरोबरच इतर देशांतही मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. दरम्यान,अमेरिकेच्या शेजारील देश कॅनडामध्येही राम मंदिराबाबत प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र, गेल्या वर्षी सप्टेंबरपासून भारत आणि कॅनडामध्ये तणाव आहे मात्र असे असूनही, जस्टिन ट्रुडो यांच्या सरकारने अयोध्येतल्या राम मंदिर सोहळ्याची विशेष दखल घेत २२ जानेवारी हा विशेष दिवस म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे.
हिंदू समुदायाच्या आस्थेचा मान राखत ओकव्हिलेचे मेयर रॉब बर्टन आणि ब्रॅम्प्टनचे मेयर पॅट्रिक ब्राऊन यांनी याबाबत पुढाकार घेतला होता. कॅनडामध्ये असणाऱ्या ओकव्हिले आणि ब्रॅम्पटन या शहरांमध्ये 22 जानेवारी हा विशेष दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.. 22 जानेवारीचे महत्त्व लक्षात घेऊन ओकव्हिलेचे महापौर रॉब बर्टन आणि ब्रॅम्प्टनचे महापौर पॅट्रिक ब्राउन यांनी हिंदू समाजाच्या श्रद्धेचा आदर राखत हा पुढाकार घेतला आहे.
अयोध्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वावर भर देत राम मंदिराचे उद्घाटन शांतता, एकता आणि सौहार्दाच्या मूल्यांचा पुरावा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. .
500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. यानिमित्ताने, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे नेतृत्व करतील, जो शतकानुशतके जुन्या स्वप्नांच्या आणि आकांक्षांच्या स्वप्नपूर्तीचे भव्य प्रतीक असेल.असे कॅनडामधल्या दोन्ही शहरांच्या महापौरांनी म्हंटले आहे.
यानिमित्ताने देशभरातील मान्यवरांना अयोध्येतल्या भव्य सोहळ्यात आमंत्रित करण्यात आले आहे.अमेरिका, बुडापेस्ट, ब्रिटनसह इतर देशांमध्येही अयोध्येतल्या ह्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.