आज नाशिकमध्ये ठाकरे गटाचे राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून भाजपा, एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आपली शिवसेना पळविणाऱ्यांचा राजकीय वाढ करावाच लागेल अशी घणाघाती टीका ठाकरेंनी केली आहे.
उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, ” ज्यांनी माझ्या भगव्याशी प्रतारणा केली. आपल्या हक्काची, स्वतःची शिवसेना पेलवणारे कोणी असतील वाली असतील , आणखीन कोणी असतील आणि त्यांचा कोणीही वाली असेल तरी त्यांचा आम्ही राजकारणात वध केल्याशिवाय राहणार नाही. हा खरा निर्धार करा. कारण आता सगळे राममय झालेले आहे. मात्र जनतेचे प्रश्न तसेच आहेत. कालचा सोहळा झाला. राम की बात हो गयी अभी काम की बात करो. पहिले पाच वर्षे पंतप्रधान जगभर फिरत होते मात्र अयोध्येला गेले नव्हते.तुम्ही १० वर्षांमध्ये काय केले हे तुम्ही पहिले सांगा?” असा सवाल ठाकरेंनी विचारला.
तसेच ठाकरे पुढे म्हणाले, ”मोदी लक्षद्वीपला गेले मात्र मणिपूरला गेले नाहीत. अमरावती जिल्ह्यात वर्षभरात ११०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. पीक विमा नाही, नुकसान भरपाई नाही. दोन कोटी नोकऱ्या कुठे आहेत? कोणाला तरी पकडतात आणि मिळाले हे सांगतात. चॅनेल्सवर देखील इतका दबाब आहे की , त्यांना ते म्हणतील तेच दाखवावे लागते. हिंमत असेल तर समोरासमोर या ना मैदानात मग बघू काय करायचे? ”